ऑनलाइन टिम :
इचलकरंजी कोरोना महामारी संकटाचा पूर्वानुभव पाहता इचलकरंजीकरांनी दुसरी लाट येऊ नये यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे. शहरात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) नको असेल तर सर्वांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले. तसेच मंगळवारपासून शहरात ठिकठिकाणी मास्क तपासणीसह खासगी व सरकारी आस्थापनांची तपासणी, विनापरवाना शाळा, कोचिंग क्लास, सांस्कृतिक कार्यालये आदींची पथकांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. गर्दी आढळून येणार्या ठिकाणांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचेही डॉ. खरात यांनी सांगितले.
गत महिन्यात कोरोनामुक्त झालेल्या इचलकरंजीत कोरोनाची दुसरी लाट येऊ लागली असून दोन दिवसात पाच रुग्ण मिळून आल्याने प्रांताधिकारी कार्यालयात उपाययोजना संदर्भात सोमवारी बैठक पार पडली. बैठकीस आमदार प्रकाश आवाडे, मुख्याधिकारी शरद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, नंदकुमार मोरे, इकबाल महात आदी उपस्थित होते.शहरात पुन्हा नव्याने रुग्ण मिळून येत असल्याबद्द आमदार आवाडे यांनी चिंता व्यक्त करत नागरिकांनी स्वत:सह इतरांची काळजी घ्यावी. प्रशासनानेही आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासह नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करावी, असे आवाहन केले.
----------------------------------Must Read
1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम
3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले
------------------------------------
त्यानुसार महसूल, नगरपरिषद, पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग यांची संयुक्त पथके निर्माण करुन त्या माध्यमातून शहरातील सर्वच खाजगी व शासकीय आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाईसह प्रसंगी गुन्हे ( Complaint) दाखल केले जातील. व्हिडीओ चित्रीकरण तसेच मोबाईलवरील क्लिपवरून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे नागरिकांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.