He-became-girl-to-get-mobile


ऑनलाइन टिम:

 मित्रानं चोरलेला आपला मोबाईल (mobile) परत मिळवण्यासाठी चेन्नईतील (chennai) एका तरुणानं वेगळीच शक्कल लढवली. मुलगी बनून त्यानं मित्रांच्या सहाय्यानं कट रचला आणि आपला मोबाईल मिळवला. पोलीस ठाण्यामध्ये याची तक्रार नोंदवली गेल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.20 वर्षांचा सारावनननं पझहल लेक पोलीस सठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या टोळीनं पझहल लेक परिसरात माझं अपहरण करुन माझ्याकडील मोबाईल आणि बाईक हिसकावून घेतली, असं त्यानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितलं, या गॅंगमधील आरोपींची ओळख पटली आहे. लोकेश (वय 20) याने अन्य चौघांच्या मदतीने प्लॅननुसार हे कृत्य केलं आहे. अन्य चारजण महाविद्यालयीन विदयार्थी असून त्यात विनोद कुमार (वय 19, ओरागडम), प्रताप (वय23, गांधीनगर), प्रवीण (वय 24, कलाईवनार रस्ता) आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.तपासात लोकेश आणि सारावनन हे दोघंही मित्र (friends) असल्याचं समोर आलं. 18 जानेवारीला सारावनननं लोकेशचा मोबाईल  (mobile) फोन चोरला होता. याबाबत अंबाथूर पोलीस स्टेशनमध्ये (Ambathur Police Station) तक्रारही दिली होती.

------------------------------

Must Read

 पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर चोरलेला फोन परत मिळवण्यासाठी लोकेशने हा कट रचला.इन्स्टाग्रामवर (Instagram) त्यानं आपलं एक फेक अकाऊंट बनवलं. मुलगी असल्याचे भासवलं आणि सारावननशी मैत्री केली. त्याच्या प्रेमात (love) पडल्याचं नाटक केलं आणि त्याला पझहल लेक परिसरात भेटायला बोलावलं. सारावनन पझहल परिसरात येताच मास्क घातलेल्या लोकेश आणि त्याच्या मित्रांनी सारवनानला मारहाण केली आणि त्याचा मोबाईल फोन आणि टू व्हिलर हिसकावून घेत ते पसार झाले.