उर्जा क्षेत्रासाठी तीन लाख पाच हजार कोटीची गुंतवणूक (Investment)

- गॅस वितरण जाळ्यात आणखी 100 शहरांचा समावेश एका शिवाय अधिक वीज वितरण कंपन्यांचा पर्याय देणार नाशिक, नागपूर, बंगळुरू, चेन्नई आणि कोची मेट्रो प्रकल्पांसाठी तरतूद

-बंदरांच्या खासगी-सार्वजनिक क्षेत्रातून विकासासाठी दोन हजार कोटी

-व्यावसायिक व्यवस्थापन असणाऱ्या विकास आर्थिक संस्था उभारणार त्यासाठी भांडवल 27 हजार कोटी

-सार्वजनिक बस वाहतुकीसाठी केंद्राकडून 18 हजार कोटी रुपये देणार

-येत्या सहा वर्षात केंद्रीय आरोग्य योजनद्वारे आरोग्य व्यवस्था सुधारणार

-प्रधानमंत्री आत्मनिर्भार स्वस्थ भारत योजना राबवणार त्यासाठी 64 हजार 189 कोटीची तरतूद करणार

-सध्याची राष्ट्रीय आरोग्य योजना सुरू ठेवणार

-रेल्वेसाठी एक लाख10 हजार कोटीची गुंतवणूक, त्यातील एक लाख सात हजार कोटीची भांडवली गुंतवणूक करणार

-यावर्षी 11 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग या वर्षात उभारणार त्यात 3500 किमीचा तामिळनाडूतील कॉरिडोर

1100 किमीच्या केरळमधील प्रकल्पांसाठी 65 हजार कोटी 675 कोटी च्या प. बंगालमधील प्रकल्पासाठी 95 हजार कोटी तर आसाममध्ये तीन वर्षात 1300 किमीचा प्रकल्प राबवणार

-रस्ते विकासाठी विशेष आर्थिक क्षेत्रे उभारणार. त्यासाठी यंदा 5.45 लाख कोटीची गुंतवणूक गेल्यावर्षी ही तरतूद 4.39 लाख कोटी होती.

-बंगालमधील रस्ते विकासाठी 25 हजार कोटी

-येत्या तीन वर्षात सात टेक्‍स्टाईल पार्क उभारणार