9 thousand cash lampas

ऑनलाइन टिम :

Crmie News-हातकणंगले - वडगाव रोडवरील वसगडे मळा, हातकणंगले येथील चिंतामणी गणेश मंदिरामधील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री पळवून नेऊन फोडून त्यातील अंदाजे नऊ हजार रुपयांची रोकड लंपास केली. याबाबतची फिर्याद  (Complaint) मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी पोलिसांत दिली आहे.

----------------------------

बुधवारी सकाळी दररोजच्या पूजेसाठी आलेल्या नागरिकांना मंदिरामध्ये चोरी झाल्याचे निर्दशनास आले. त्यांनी मंडळातील सदस्य आणि हातकणंगले पोलीस यांना चोरीची माहिती दिली. सोमवारी चिंतामणी गणेश मंडळाची गणेश जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न झाली होती. यावेळी अनेक भक्तांनी दानपेटीत पैसे टाकले होते. अज्ञात चोरट्यांनी याचाच फायदा घेत पेटीचे कुलूप तोडून सर्व रोकड लंपास केली. याची तक्रार मंडळाचे अध्यक्ष सुरेश वसंत कोळी यांनी हातकणंगले पोलिसात दिली असून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा  (Complaint) दाखल झाला आहे.