Missing girl found in 5 hours shahapur policeऑनलाइन टिम :

इचलकरंजी :शहापूर येथील चिंतामणी कॉलनी येथे राहणाऱ्या अंजली कृपाशंकर सिंह वय वर्षे सहा ही लहान मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. पण शहापूर पोलीस (Police) ठाण्याच्या कार्यतत्पर त्यामुळे केवळ 5 तासात या मुलीचा शोध घेऊन सुखरूप​ आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे सर्वत्र शहापूर पोलिसांची कौतुक होत आहे.


शहापूर राम मंगल कार्यालयनजीक बाबासाहेब देसाई यांचे घरी कृपाशंकर सिंह मुळगाव जमुवाव तालुका कराड जिल्हा गाजीपुर उत्तर प्रदेश हे आपली पत्नी व मुलीसह भाड्याने राहण्यास आहेत. आज सकाळी सहा वाजता मुलगी अंजली​ खेळत खेळत घराबाहेर पडली तर पत्नी गुडिया हि घरी​ कापडी पिशवी शिवण्याची कामात व्यस्त होती. परंतु तासाभरानंतर मुलगी दिसेनाशी झाल्याने तिचा शोध सुरू केला. परंतु ती मिळून न​ आल्याने शहापूर पोलीस (Police) ठाण्यात धाव घेण्यात आली.

----------------------------


अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचे​ गांभीर्य ओळखून पोलीस उपाधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश खराडे यांनी होमगार्डचे एक पथक, शहापूर पोलिसांचे एक पथक व स्थानिक नागरिकांचे एक पथक​ (Squad) असे​ तीन पथके नेमून शोधमोहीम सुरू केली मुलगीचा फोटो दाखवत व​ लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मार्ग काढीत गेले असता सुमारे तीन किलोमीटरवरती कोरोची या गावामध्ये ती​ मुलगी सुखरूपपणे मिळाली त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.