firingcrime news- भिवंडीतील काल्हेर परिसरात एका महिलेवर गोळीबार (firing on woman) झाल्याने खळबळ उडाली आहे. जयश्री देडे (३८) असे या महिलेचे नाव असून तिच्या डोक्यात एक गोळी (firing)लागली असून सध्या तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान गोळीबाराचा (firing) प्रकार घडला असून त्यावेळी ही महिला घरी एकटीच होती. मुलगा बाहेर गेला होता. सकाळी दोघे जण घरी आले. बाचाबाची झाल्यानंतर आरोपींनी महिलेवर गोळीबार केला. एकूण दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी महिलेला लागली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त पी. बी. ढोले यांनी दिली.

--------------------------------------

Must Read

1) कचरा डेपोप्रश्‍नी इचलकरंजीत आंदोलन

2) एकच चर्चा, हवा फक्त कोल्हापूरचीच...!

3) "सीरम'ला पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

--------------------------------------

महिला बेशुद्ध असून गोळीबार (firing on woman) केल्यानंतर आरोपी पळून गेले. आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र गोळीबार नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्यानंतर स्पष्ट होईल,असे पोलिसांचे म्हणणे आहे. जयश्री या मूळच्या उस्मानाबादच्या आहेत.