allegation on dhananjay munde


राष्ट्रवादी काँग्रेसचे (politics party of india) नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा हिने पोलिसात बलात्काराची तक्रार (rape case) दाखल केली आहे. तीने 10 जानेवारीला ओशिवरा पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. तरुणीने केलेल्या आरोपांनुसार 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध (relationship) ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

--------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...

2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

--------------------------------------

एक बॉलिवूड गायिका

रेणू अशोक शर्मा असे मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे पुर्ण नाव आहे.रेणू ही एक बॉलिवूड गायिका आहे. तिच्या यांच्या दाव्यानुसार, तिची आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये करुणा शर्मा यांच्या घरी भेटले. त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. 

धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेना माहिती होतं त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शाररिक संबंध (relationship) प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता.मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली

यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहिण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शाररिक संबंध प्रस्थापित केले.