mumbai indians
cricket news- आयपीएलच्या या मोसमासाठी (IPL) सगळ्या 8 टीमना त्यांनी कायम ठेवलेले खेळाडू आणि सोडून देण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी आज जाहीर करणं बंधनकारक आहे. आयपीएलची सगळ्यात यशस्वी टीम असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यामध्ये कोणत्या खेळाडूंना सोडून देणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. पण मुंबईच्या टीममध्ये फार काही बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

आयपीएल इतिहासातली मुंबई ही सगळ्यात यशस्वी टीम आहे. सर्वाधिक पाच वेळा मुंबईने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. 2020 साली युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्येही मुंबईचाच विजय झाला होता. सध्याच्या घडीला मुंबईची टीम सगळ्यात संतुलित असल्यामुळे ते फार काही बदल करणार नाहीत.

-----------------------------------

Must Read

1) पवार, उद्धव, राज, फडणवीस शनिवारी एकाच मंचावर

2) इंटरनेट केबलची चोरी करणार्‍यास अटक

3) वादग्रस्त ठरलेल्या भुयारी गटर कामाची नव्याने निविदा

-----------------------------------

मुंबईची (Mumbai Indians) टीम

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्विंटन डिकॉक, कायरन पोलार्ड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, नॅथन कुल्टर नाईल, जेम्स पॅटिनसन, अनमोलप्रीत सिंग, आदित्य तरे, जयंत यादव, धवल कुलकर्णी, अनुकूल रॉय, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय सिंग, शरफेन रदरफोर्ड, मिचेल मॅकलॅनघन, क्रिस लीन

या खेळाडूंना सोडणार?

यंदाच्या वर्षीचा (IPL)  लिलाव छोटा असल्यामुळे मुंबईची टीम फार खेळाडूंना सोडणार नाही. ट्रेन्ट बोल्ट वगळता तसंच लसिथ मलिंगा फिट असेल तर एखाद्या परदेशी फास्ट बॉलरला सोडण्याचा निर्णय मुंबई घेऊ शकते. मागच्या मोसमात क्रिस लीन यालाही खेळण्याची संधी मिळाली नव्हती, त्यामुळे त्याच्याबाबतही विचार होऊ शकतो. याचसोबत प्रिन्स बलवंत आणि मोहसीन खान यांना सोडून देऊन एखाद्या स्पिनरला लिलावात विकत घेतलं जाऊ शकतं.