what-happened-when-deepika-padukone-caught-ranbir-kapoor

(Realeshionship) दीपिका पादुकोणने (Deepika Padukoneओम शांती ओम या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. या पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. दीपिकाने एक मॉडेल म्हणून तिच्या करियरला सुरुवात केली. मॉडलिंग दिवसांमध्येच दीपिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. आज तर बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. आज म्हणजेच ५ जानेवारीला तिचा वाढदिवस असून तिने बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्ये देखील तिची एक ओळख निर्माण केली आहे.

दीपिकाच्या व्यवसायिक आयुष्याप्रमाणेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. दीपिकाचे लग्न रणवीर सिंगसोबत झाले असून त्यांच्या फॅन्सना त्यांचे कपल प्रचंड आवडते. (Realeshionship) रणवीरसोबत लग्न होण्याआधी दीपिका रणबीर कपूरसोबत नात्यात होती. त्यांच्या अफेअरची त्याकाळात चांगलीच चर्चा झाली होती. दीपिकाने रणबीरच्या नावाच्या आद्याक्षराचा आरके टॅटू देखील गोंदवला होता. ते दोघे लग्न करतील असे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांनी अचानक ब्रेकअप करत सगळ्यांना धक्का दिला. 

रणबीर आणि दीपिकाचे ब्रेकअप का झाले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. दीपिकाने रणबीरचे नाव न घेता एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्यासाठी नातेसंबंध खूपच वेगळे आहेत. मी एखाद्यासोबत नात्यात असताना त्याला कधीच धोका देणार नाही. मला मजामस्तीच करायची असेल तर मी सिंगल राहील... पण सगळ्यांचे विचार माझ्यासारखे नसतात. यामुळे मला खूप गोष्टींचा सामना करावा लागला. मी माझ्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते. तो मला धोका देतोय हे कळल्यावर मी त्या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार देखील केला होता. पण त्याने माझी माफी मागितली. माझ्याकडे अक्षरशः भीक मागितली. त्यामुळे मी त्याला दुसरी संधी दिली. पण हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती. कारण पहिल्यांदा त्याने मला धोका दिला, त्यावेळी माझी काही चूक असेल किंवा मी माझ्या नात्यात कमी पडले असेन मला वाटले होते. पण ज्याला धोका देण्याची सवयच असते तो कधी सुधारत नाही. 

या मुलाखतीत तिने पुढे सांगितले होते की, मी नात्यात समोरच्याला खूप काही दिले. पण मला परत काहीच मिळाले नाही. एखाद्या नात्यातील विश्वास संपला की नाते तुटते असे मला वाटते.