सई ताम्हणकरने ट्विटरवर (twitter) पुनरागमन केलं आहे. काही महिन्यांनी मी परत आले आहे. पण मला अकारण ट्रोल केलं तर तसंच उत्तर दिलं जाईल अशी वॉर्निंगच तिने ट्रोलर्सना (trolled) दिली आहे. सई ताह्मणकर गेले काही महिने फारशी अॅक्टिव्ह नव्हती.
२१ सप्टेंबर नंतर तिने थेट नव्या वर्षी म्हणजे १ जानेवारीला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे. त्यानंतर तिने आज काही वेळापूर्वी ट्विट करत मी पुन्हा एकदा ट्विटरवर अॅक्टिव्ह झाले आहे पण अकारण ट्रोल केलं तर तसंच उत्तर दिलं जाईल असं सईने म्हटलं आहे.
------------------------------------
Must Read
1) कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग
2) IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता
3) तुम्ही ही गिझर वापरताय तर सावधान!
4) धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने केले वार
-------------------------------------
सई ताम्हणकर ही मराठीतली बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने धुरळा या सिनेमात केलेल्या कामाचंही कौतुक झालं. तसंच गर्लफ्रेंड, राक्षस या सिनेमातल्या भूमिकाही गाजल्या. सई ताम्हणकर इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
पण गेल्या काही महिन्यांपासून ती ट्विटरवर फारशी अॅक्टिव्ह नव्हती. आता ती ट्विटरवरही (twitter) अॅक्टिव्ह झाली आहे. तिने अकारण ट्रोल (trolled) कराल तर त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असं म्हणत ट्रोलर्सना इशाराच दिला आहे.