telecom companyटेलिकॉम कंपनी (telecom company)  वोडाफोन-आयडिया (Vi) दिल्लीत 15 जानेवारीपासून आपली 3G सेवा बंद करणार आहे. या बदलामुळे कंपनीने दिल्ली सर्कलमधील आपल्या ग्राहकांना आपलं सिम कार्ड 4G मध्ये अपग्रेड करण्यास सांगितलं आहे.

कंपनीने (telecom company) उचललेलं हे पाऊल म्हणजे स्पेक्ट्रम रि-फार्मिंगचा एक भाग आहे, ज्याअंतर्गत ऑपरेटर 4G सेवांसाठी आपल्या 3G स्पेक्ट्रमचा वापर करत आहे. बेंगळुरू आणि मुंबईत हे आधीपासून सुरू झालं आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या वोडाफोन-आयडिया ग्राहकांना आपल्या जवळच्या स्टोअर्समधून 3G सिमला 4G मध्ये अपग्रेड करावं लागेल.

---------------------------------------

Must Read

1) आज कोरोना लसीसंदर्भात होणार मोठा निर्णय?

2) Amazon-Flipkart वर कारवाई करणार ED आणि RBI, मोदी सरकारचे निर्देश

3) महत्वाची बातमी : परदेशातील उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

5) 2021 हे आरोग्यप्रश्न सोडवण्याचे वर्ष

--------------------------------------


गॅजेट्स 360 च्या एका रिपोर्टनुसार, याबाबत माहिती देण्यासाठी Vi ने दिल्ली सर्कलमधील ग्राहकांना SMS पाठवण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांनी आपलं जुनं सिम 15 जानेवारी 2021 आधी 4G मध्ये अपग्रेड करावं असा मेसेज पाठवण्यात येत आहे.

जे ग्राहक आपलं सिम 4G मध्ये अपग्रेड करू शकणार नाहीत, त्या ग्राहकांना Vi 2G द्वारे केवळ व्हॉईस कॉलिंग सुविधा देणं सुरू ठेवणार आहे. मात्र वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना आपल्या फोनवर डेटा आणि व्हॉईस सेवा सुरू ठेवायचं असल्यास, त्यांना 3G सिम 4G मध्ये अपग्रेड करावं लागणार आहे.