mobile-phones/vivo-y31-with-snapdragon-662-soc-priced

Vivo ने आपला Y-सीरीज अंतर्गत आणखी एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. विवो Y31 (Vivo Y31) स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा AI रियर कॅमेरा आणि अँड्रॉयड 11 बेस्ड कलर ओएस दिला आहे. हँडसेटला देशात २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केले आहे. विवो कंपनीने याच आठवड्यात Vivo Y20s ला देशात लाँच केले आहे. जाणून घ्या या फोनची किंमतसह अन्य फीचर्स.

Vivo Y31 ची किंमत
विवोच्या या स्मार्टफोनला १६ हजार ४९० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. हँडसेटला देशात पार्टनर रिटेल स्टोर शिवाय विवो इंडिया ई-स्टोर, अॅमेझॉन (Amazon, फ्लिपकार्ट आणि पेटीएम वरून खरेदी करता येऊ शकते. विवोचा हा फोन रेसिंग ब्लॅक आणि ओशन ब्लू कलर मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

Vivo Y31 चे फीचर्स
विवोच्या स्मार्टफोनमध्ये ६.५८ इंचाचा फुल एचडी प्लस (2408 × 1080) पिक्सल एलसीडी आईपीएस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम व १२९ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. विवोच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर दिला आहे.

विवोचा हा फोन अँड्रॉयड ११ बेस्ड कलर ओएस काम करतो. फोन प्लास्टिक बॉडी सोबत येते. या फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सोबत २ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये कनेक्टिविटी साठी ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, जीपीएस, यूएसबी टाइप-सी, एफएम रेडियो, ग्लोनास यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच, एक्सीलेरोमीटर, एम्बियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, ई-कंपास दिले आहेत.