trending on social media


भारतीय संघाचा कर्णधार विराच कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला (anushka sharma) सोमवारी मुलगी झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर (trending on social media) तर जन्मानंतर अवघ्या काही क्षणांतच हा विषय ट्रेंडमध्ये आला. मुलीचं (baby girl) नाव ते तिचा पहिलं छायाचित्र या साऱ्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

कोहली कुटुंबात या चिमुरडीचे आगमन झाल्याने प्रत्येकजण खूप आनंदित आहे. त्याचबरोबर बॉलिवूड आणि क्रिकेट जगातील अनेक नामवंत या निमित्ताने या जोडीचे सतत अभिनंदन करत असतात. हे चित्र विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने शेअर केले आहे. 

--------------------------------------

Must Read

1) कृषी कायद्यांना स्थगिती; शरद पवार म्हणतात की...

2) चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

3) १६ जानेवारीपासून होणार लसीकरण

--------------------------------------

अनुष्का आणि विराट यांना मुलगी झाल्यानंतर आता त्यांच्या मुलीचे नाव काय असणार याची उत्सुकता या दोघांच्या फॅन्सना लागली आहे. पण त्यांच्या नावाबाबत एक बातमी मीडियात आलेली आहे. विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव बाबा अनंत महाराज ठेवणार आहेत. विराट आणि अनुष्का हे दोघेही अनंत महाराज यांना प्रचंड मानतात. त्यामुळे याआधी देखील त्यांनी अनेकवेळा त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींशी निगडित गोष्टींवर त्यांचा सल्ला घेतलेला आहे. 

virat and anushka baby


11 डिसेंबर 2017 रोजी या जोडप्याने इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. तेव्हापासून या सेलिब्रिटी दाम्पत्याचे सोशल मीडियावर (trending on social media) खूप प्रेम होत आहे. या दोघांनाही त्यांच्या चाहत्यांचे खूप प्रेम मिळत आहे. गर्भावस्थेत अनुष्का सुपरअॅक्टिव दिसली होती- प्रसूतीपूर्वी अनुष्काची सुपरऍक्टिव स्टाईल लोकांना आवडली. ट्रॅ डमिलवर चालत असताना अभिनेत्रीने तिचा बुमरंग व्हिडिओ शेअर केला होता. या क्लिपमध्ये अभिनेत्री कॅमेर्‍यामध्ये पोज देताना बर्‍यापैकी आनंदी दिसत होती. यादरम्यान, त्याच्या चेहऱ्यावरही प्रेग्नन्सीची चमक दिसून येत होती.