master movie


दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मास्टर’ हा करोना काळात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने box office वर जणू काही जादूच केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये चित्रपटाने जवळपास १८० कोटी रुपयांची कमाई (box office) केल्याचे समोर आले आहे.

मास्टर या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जगभरातून जवळपास १८८.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात चित्रपटाने ११४ कोटी रुपयांची कमाई केल्याचे म्हटले जात आहे. ‘मास्टर’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास ३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. करोना काळात इतकी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

--------------------------------
Must Read


1) ठाकरे सरकारने आता घेतले 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय

2) आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती

3) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे म्हणाले…

--------------------------------

‘मास्टर’ हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, यूएई आणि इतर काही देशांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने box office वर धूमाकुळ घातला आहे. मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचे समोर आले. मुराद खेतानी दोन आठवड्यांपूर्वी मास्टर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हैदराबदला गेले होते. त्यांना चित्रपट (box office) प्रचंड आवडला आणि त्यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी रक्कमही दिली असल्याचे म्हटले जाते.

‘मास्टर’ या चित्रपटात अॅक्शनचा भरणा आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. या चित्रपटात विजय सेतुपतिसोबतच मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.