Genelia D'Souza and ritesh deshmukh
bollywood gossip- हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या जोडीकडे पाहिलं जातं. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकताच रितेश आणि जेनेलियाचा रोमँटिक व्हिडीओ (video viral) समोर आला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत जेनेलियाने म्हटले की फॉरेव्हरवाली लव्ह स्टोरी. या व्हिडीओला (video viral) चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. तासाभरात या व्हिडीओला एक लाख ऐंशी हजाराहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. इतकेच नाही तर या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

 

--------------------------------

Must Read

📺 फक्त ११३० रुपयात घरी घेऊन जा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही

📲 सर्व मेसेजिंग Apps आता इथे एकाच ठिकाणी मिळणार

🏏 बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिके

--------------------------------

जेनेलिया आणि रितेशच्या प्रेम प्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरू असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला होता. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत परतल्यावर ते दोघे एकमेकांना मिस करू लागले. एकमेकांना भेटण्याची ते संधीच शोधत असत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्या दोघांना देखील कळले नव्हते.(bollywood gossip)

जेनेलिया आणि रितेश यांचे अफेअर सुरू झाल्यानंतर त्यांना लगेचच लग्न करायचे होते. पण रितेशनचे वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सुरुवातीला रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला विरोध होता. जेनेलिया ही ख्रिश्चन तर रितेश हा हिंदू असल्याने विलासरावांना हे लग्न मान्य नव्हते. पण काही काळांनी त्यांचा विरोध मावळला आणि रितेश आणि जेनेलिया यांचे लग्न धुमधडाक्यात झाले. त्या दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने विवाह केला.