vodafone idea telecom company


टेलिकॉम कंपनी (telecom company) वोडाफोन-आयडियाकडे अनेक प्रीपेड प्लान्स आहेत. जर तुम्हाला जास्त डेटा हवा असेल तर ५०० रुपयांपासून कमी किंमतीत एक रिचार्ज प्लान (recharge plan) आहे. या प्लानमध्ये रोज ४ जीबी डेटा ऑफर दिली जात आहे.

वोडाफोन-आयडियाचा ४४९ रुपयांचा प्लान

५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारा वोडाफोन - आयडियाच्या (telecom company) प्लानमध्ये युजर्संना रोज ४ जीबी डेटा मिळतो. परंतु, यासोबत या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेडची सुविधा आणि प्रतिदिन १०० एसएमएस सुद्धा दिले जाते. हा प्लान विकेंड डेटा रोलओवरची सुविधा सुद्धा देतो. याचाच अर्थ सोमवार ते शुक्रवार या दरम्यान उरलेला डेटाला रविवारी वापरता येऊ शकते. याशिवाय वोडाफोन आयडिया मूव्हीज अँड टीव्हीचे अॅक्सेस या प्लानमध्ये युजर्सला दिले जाते. हा प्लान डबल डेटा ऑफर (२ जीबी प्लस २ जीबी डेटा) सोबत येतो.

--------------------------------
Must Read


1) ठाकरे सरकारने आता घेतले 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय

2) आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती

3) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे म्हणाले…

--------------------------------

किती दिवसांची वैधता मिळते

वोडाफोन-आयडियाचा ४४९ रुपयांचा प्लान (recharge plan) सोबत युजर्सला ५६ दिवसांची वैधता मिळते. याचाच अर्थ या प्लानमध्ये युजर्संना २२४ जीबी डेटा ऑफर केला जात आहे.

वोडाफोन आयडियाचा २९९ रुपयांचा प्लान

३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील या प्लानमध्ये युजर्संना रोज ४ जीबी डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सोबत रोज १०० एसएमएस ऑफर केले जाते. या प्लानमध्ये ४४९ रुपयांच्या प्लानप्रमाणे युजर्संना विकेंड डेटा रोलओवरची सुविधा देते. अन्य बेनिफिट्समध्ये या प्लानमध्ये वोडाफोन आयडिया मूव्हीज अँड टीव्हीचे फ्री अॅक्सेस मिळते.

या प्लानमध्ये किती वैधता

या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. याचाच अर्थ या प्लानध्ये एकूण ११२ जीबी डेटा दिला जातो. वोडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये युजर्संना Amazon Prime आणि Disney+ Hotstar चे बेनिफिट दिले जात नाही.