
(Coronaviruse) कोरोनावरील (Coronaviruse) प्रतिबंधात्मक लस (vaccin news)आज येथे दाखल झाली आहे. येथून या लशीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली जिल्ह्यासाठीही दुपारी रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधासाठीचे लसीकरण येत्या शनिवारी (ता.16) पासून सुरू होणार आहे.
कोल्हापूर शहरात सहा तर ग्रामीण भागातील आठ केंद्रांवर लसीकरण होईल. एका दिवसात 1400 जणांना लस टोचण्यात येईल. त्यासाठी सीपीआर रूग्णालयासह अन्य 13 ठिकाणी स्वंतत्र कक्ष तयार केले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोरोना योध्द्यांना लस टोचण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. एका केंद्रावर कमीत कमी शंभर लाभार्थ्यांना लसीकरण होणार आहे.
त्यासाठी आशा व वैद्यकीय कर्मचारी वर्गाने यापूर्वी केलेल्या सर्व्हेचा आधार घेतला जाईल. यात गेल्या आठ महिन्यात शासकीय स्तरावर कोरोनायोध्दा म्हणून काम केलेल्या वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांना प्राधान्याने लस देण्यात येईल. त्यासोबत विविध शासकीय विभागातील कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यांनाही लसीकरणाचा लाभ देण्यात येणार आहे.
--------------------------------------
Must Read
असे होईल लसीकरण
दुसऱ्या कक्षात ः संबधित लाभर्थ्यांचे तापमान, तसेच ऑक्सिजनची पातळी, तपासली जाईल. त्यानंतर निर्जुंतूकीकरण होईल. त्यानंतर लाभार्थ्यांला लसीकरण कक्षात प्रवेश असेल.
तिसऱ्या कक्षात ः दोन वैद्यकीय कर्मचारी नोंदणीकृत लाभार्थी तोच आहे का, याचे ओळखपत्र पाहून खात्री करून घेतील. त्यांची नोंद कोविन ऍपमध्ये होईल.
चौथ्या कक्षात ः लसीकरण कक्षात लसीकरण (vaccin news) प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून संबधित लाभार्थीला इंजक्शनव्दारे लस टोचली जाते. हेच कर्मचारीला लसीबाबत माहिती देतील.