digital payment


केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर (digital payment) जोर दिल्यापासून नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत. पेटीएम, गुगल पे, फोन पे यांसारख्या अनेक upi payment अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. जर तुम्हीही ऑनलाइन पेमेंटसाठी UPI चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) पुढील काही दिवस युपीआय पेमेंटमध्ये समस्या जाणवू शकते अशी महत्त्वाची माहिती युजर्सना दिली आहे. रात्री १ ते ३ वाजेदरम्यान युपीआय पेमेंटच्या सेवेमध्ये समस्या जाणवू शकते… पुढील काही दिवस ही समस्या जाणवेल…ग्राहकांनी त्यानुसार युपीआय व्यवहारांचं नियोजन करावं असं NPCI ने सांगितलंय. यादरम्यान सिस्टिम अपग्रेडचं काम केलं जाणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलंय. ट्विटरद्वारे NPCI ने ही माहिती दिली आहे.

------------------------------------

Must Read

💪1) धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा

😱 2) पेट्रोल 92 च्या पार, डिझेलचेही दर वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

 🏢 3) बेकायदेशीर बांधकाम प्रकरण, उच्च न्यायालयाचा सोनू सूदला दणका

------------------------------------


ही समस्या किती दिवस जाणवेल हे मात्र नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने सांगितलेलं नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी नव्या वर्षापासून upi payment  व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार असल्याचं वृत्त आलं होतं. मात्र त्यात कोणतंही तथ्य नसून चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि सहजसोप्या पद्धतीने UPI व्यवहार सुरू ठेवा, कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे स्पष्टीकरण NPCI ने दिले होते.