bjp and mns


politics news- भाजपचा जुना मित्र असलेल्या शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करुन राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडल्यानंतर मनसेने हिदुत्वााचा मुद्दा उचलून धरत नवीन राजकीय वाटचाल सुरु केली. यावर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी आपली मते व्यक्त केली. मात्र, आता भाजपने (bjp) मनसेसोबतच्या युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्राकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांनी मनसेसोबतच्या युतीबाबत पाटील यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची चर्चा करण्यात आलेली नसल्याचे पाटील यांनी सांगितले. (politics news)

--------------------------------------

Must Read

1) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

2) आमदाराच्या मुलीच्या लग्नात कलेक्टरांचं मारलं पाकीट

3) बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री

4) धक्कादायक! पोलीसच करत आहेत गुंडागर्दी, VIDEO

5) सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून

6) अबब... ! करीना कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण

--------------------------------------

चंद्रकांत पाटील (chandrkant patil) यांनी आज (सोमवार) महापौर मुरलीधर मोहोळ व पक्षाच्या नगरसेवकांसह महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी शहरातील विविध विकास कामांवर चर्चा केली. यामध्ये समान पाणी पुरवठा योजना, नाले रुंदीकरण व खोलीकरण, डीपी रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या टीडीआर व रोख मोबदला देण्याबाबतच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली.