खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेसातारा येथील पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayan Raje Bhosale)  यांनी ग्रेड सेपरेटरचं उदघाटन (opening event) करत सर्वाना आश्चर्यचकित केले. त्यानंतर वार्ताहरांना बोलताना, “कधी कधी मी धक्के देतो आणि कधी हे धक्के मलाही बसतात,” असे त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये सांगितले. तथापि, आजपासून सर्वाना ग्रेड सेपरेटरचा मार्ग खुला होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

छत्रपती उदयनराजे म्हणाले, “मला धक्के देण्याची सवय आहे. कधी दुसऱ्याला बसतो कधी मला स्वतःला बसतो. ‘आदत से मजबूर’ म्हणतात तसे आहे. जुन्या सवयी जात नाहीत. मी राजकारण कधी केलं नाही. ते मला जमणारही नाही. मी आजवर समाजकारण केलं. ते सुद्धा लोकांचे हित नजरेसमोर ठेवून. तेच लक्षात ठेवून माझी पुढील वाटचालही असणार आहे.”

---------------------------------

Must Read

1) जिओची डीलरशिप हवीय? आमिषाला बळी पडू नका; १ कोटी १० लाखांची फसवणूक

2) कोरोना लसीकरणाची पुढची दिशा ठरणार?; पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

3) राजर्षी छत्रपती शाहू समाधीकरिता आठ कोटींचा निधी : एकनाथ शिंदे

---------------------------------

त्यानंतर वार्ताहरांनी रस्ता सर्वांसाठी सुरु केला जाणार का असे विचारले असता, हिंदी चित्रपटातील डायलॉग मारत ‘अभी के अभी’ असे म्हणाले. दरम्यान, उदघाटनावेळी (opening event) त्यांनी आपली कॉलर उडवली होती. त्यावर विचारले असता, “इतरांची जशी एक स्टाईल असते तशीच आपली सुद्धा आहे. आपल्याला कोणी शाबासकी देवो अगर नको. स्वतःला शाबासकी देण्याची अधिकार मलाही आहे आणि ती आपली पद्धत आहे,” असेही छत्रपती उदयनराजे यांनी सांगितले.