akshay and twinkle
entertainment news-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. १७ जानेवारी २००१ मध्ये हे दोघे लग्नबंधनात (marriage) अडकले. आज या दोघांच्या लग्नाला २० वर्ष पुर्ण झाली आहेत. अक्षय आणि ट्विंकलची लव्ह स्टोरी थोडी हटके आहे. चला जाणून घेऊया रिलेशनशीप पासून लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास...

अक्षय आणि ट्विंकल यांची पहिली भेट मुंबईत एका मॅगझीनच्या शूट दरम्यान झाली होती. ट्विंकलला पाहातच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता.अक्षयने ट्विंकलला प्रपोज केले आणि ते रिलेशनशिपमध्ये आले. मात्र इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी लग्न करायच ठरवलं.जेव्हा अक्षयने डिंपल कपाडिया यांच्याकडे ट्विंकलशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याआधी डिंपल यांना वाटत होते की अक्षय गे आहे.अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा ट्विंकलला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते. त्याचवेळी तिचा मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

-----------------------------------------

Must Read

1) मोठी बातमी: कोरोना लसीकरणाला स्थगिती

2) भांडण सोडवणाऱ्या भावांना जमावाची मारहाण

3) टेंशन संपलं! आता वर्षातून एकदाच करा मोबाइल रिचार्ज

------------------------------------------

ट्विंकल अक्षयला म्हणाली की, हा चित्रपट जर फ्लॉप झाला तर मी तुझ्याशी लग्न (marriage)करेन. तो चित्रपट फ्लॉप झाला आणि या दोघांनी लग्न केले.लग्नाआधी या दोघांची कुंडली दाखवण्यात आली नव्हती. तर ट्विंकलने अक्षयशी लग्न करण्याआधी त्याची मेडिकल हिस्ट्री मागितली होती. (entertainment news)

ट्विंकलने अक्षय कडून त्याच्या इतर नातेवाईकांबद्दल विचारलं आणि त्यांची देखील मेडिकल हिस्ट्री जाणून घेतली.ट्विंकलने अक्षयला जेव्हा हे सगळे प्रश्न विचारले होते तेव्हा अक्षय आश्चर्यचकीत झाला होता. पण त्यानंतर हे सगळं चांगल्यासाठी झालं असं अक्षय म्हणाला.अक्षय आणि ट्विंकलला आरव आणि नितारा नावची दोन मुलं आहेत.

ट्विंकल वर्तमानपत्रासाठी आर्टिकल लिहते. आणि तो आर्टिकल प्रिंट होण्याआधी ट्विंकल काय लिहते? ते बरोबर आहे का? हे तपासण्याच काम अक्षय करतो.