blind pimple


अनेकदा त्वचेच्या समस्या पाहून समजत नाही, पण हळुहळु त्या गंभीर रूप धारण करतात. जसे की ब्लाइंड पिंपल (pimple), हे दिसत नाहीत परंतु खुप त्रास देऊ शकतात. ब्लाइंड पिंपल ( pimple) स्किनच्या वर नसतात तर ते त्वचेच्या खालच्या थरावर असतात. ही समस्या जर वाढली तर डरमेटोलॉजिस्ट म्हणजे त्वचारोग तज्ज्ञांकडे जाणे आवश्यक ठरते. परंतु, जर समस्या सुरूवातीच्या टप्प्यात असेल तर तुम्ही घरगुती उपाय करू (pimple remove tips) शकता.

परिणामकारक टी ट्री ऑईल

ब्लाइंड पिपंलसाठी सर्वात परिणामकारक आहे टी ट्री ऑईल. थंडीत त्वचा तजेलदार करण्यासाठी याचा वापर केला जातो. टी ट्री ऑईलमुळे जळजळ कमी होते, शिवाय यामध्ये अँटी मायक्रोबायल गुण सुद्धा असतात.

------------------------------------------

Must Read

1) मोठी बातमी: कोरोना लसीकरणाला स्थगिती

2) भांडण सोडवणाऱ्या भावांना जमावाची मारहाण

3) टेंशन संपलं! आता वर्षातून एकदाच करा मोबाइल रिचार्ज

------------------------------------------

कसा कराल वापर?

हे थेट त्वचेवर वापरू नये. दोन चमचे टी ट्री ऑईल एक चमचा बदाम तेलात मिसळा. यानंतर कापसाने त्वचेच्या प्रभावित भागावर लावा. दुसर्‍या दिवशी पाण्याने धुवून टाका.

मधदेखील उपयोगी

मधामध्ये अँटी मायक्रोबायल प्रॉपर्टी असते तसेच हे पिंपलमुळे होणारी जळजळ कमी करते. 2 चमचे मध कापसाने पिंपल आलेल्या त्वचेवर लावा आणि तीस मिनिटांनंतर पाण्याने धुवून टाका. (pimple remove tips)

एलोवेराने सुद्धा होईल फायदा

एलोवेराचा वापर जास्तकरून त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी केला जातो. एलोवेराच्या रोपोतून एक ताजे पान कापून घ्या. पान सोलून आतील एलोवेरा जेल थेट त्वचेच्या प्रभावित भागाला लावा. रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी साध्या पाण्याने धुवून टाका.

ग्रीन टीचे अनेक फायदे

ग्रीन टी वजन नियंत्रित करण्यासाठी उपयोगी आहे. परंतु त्वचेसाठी सुद्धा याचे अनेक फायदे आहेत. ग्रीन टी ब्लाइंड पिंपल दूर करण्यासाठी उपयोगी आहे.

असा करा वापर

एक किंवा दोन ग्रीन टी  (green tea) बॅग अगोदर फ्रिजमध्ये ठेवा. नंतर ब्लाइंड पिंपलच्या ठिकाणी या बॅग तिस मिनिटपर्यंत ठेवा. ही प्रक्रिया एक आठवड्यापर्यंत करा.

जर तुम्हाला सुद्धा त्वचेची अशी समस्या असेल तर वर दिलेले उपाय तुमच्यासाठी खुप लाभादायक ठरू शकतात.