(Crime) तीन दुचाकी चोरट्यांना येथील प्रथमवर्ग न्यायालयाने (First Class Court) तीन वर्षे सक्तमुजरी आणि प्रत्येकी 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. शुभम नितीन भोसले (वय 20 रा. कोरोची), रोहित गजानन जाधव (वय 19 रा. गणेशनगर) आणि सौरभ मकरध्वज माने (वय 21 रा. जयभिमनगर) अशी त्यांची नावे आहेत. या आरोपींवर यापूर्वी पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल असून सध्या ते कारावासात आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी येथे सन 2019 मध्ये दिवाळी लक्ष्मी पुजनादिवशीच एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत शुभम भोसले, रोहित जाधव आणि सौरभ माने या तिघांसह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत विविध भागातून तीन दुचाकी चोरल्याचे समोर आले होते. (Crime) उत्तम टकले यांच्या दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले होते. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. रेडेकर यांनी तिघांनाही तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. आर. आर. दावाळे यांनी काम पाहिले. पोलीस नाईक उदय पाटील यांनी या प्रकरणा तपास केला होता.