(Politics) मराठा आरक्षणावर (Maratha reservation) तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीत खलबत सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) पोहोचले आहे. त्याआधी मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती.

महाविकास आघाडी सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे नेते आशिष शेलार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे.मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली. आज सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण भेटायला पोहोचले होते.  मराठा आरक्षण बैठकीनंतर दिल्लीत चव्हाण पवार यांच्या भेटीला पोहचले आहे.

-------------------------------------

Must Read

1) कचरा डेपोप्रश्‍नी इचलकरंजीत आंदोलन

2) एकच चर्चा, हवा फक्त कोल्हापूरचीच...!

3) "सीरम'ला पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

--------------------------------------

या बैठकीनंतर भाजपचे आमदार आशिष शेलार हे सुद्धा शरद पवार यांच्या निवास्थानी पोहोचले आहे. आशिष शेलार हे शरद पवार यांच्या निवास्थानी पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.विशेष म्हणजे, याआधी सुद्धा आशिष शेलार यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. (Politics) त्यावेळी राजकीय वातावरणात चर्चेला ऊत आला होता.

महाविकासआघाडीच्या समन्वय समितीची बैठक

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीत वेगवेगळ्या मुद्दावरून वाद सुरू असतानाच आज समन्वय समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.   महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षाचे नेते या बैठकीत सहभागी होणार आहे.  मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सायंकाळ पाच वाजता ही बैठक होणार आहे. महाविकास आघाडीत औरंगाबाद नामांतर, महामंडळ नियुक्ती रखडली यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

'राज्यातील महाविकास आघाडी काही विषयावर चर्चा समन्वय समितीत बैठकीत चर्चा होते. काही मतभेदाचे मुद्दे असतात तसंच महामंडळ नियुक्तीचे विषय यावर चर्चा होईल', अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.