ipl team rcb


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) संघाला आयपीएलचा पुढील हंगाम सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या पुढील हंगामात न खेळण्याचा निर्णय आरसीबीचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने घेतला असल्याची माहिती त्याने स्वत: ट्विटरच्या (twitter post) माध्यमातून दिली आहे. 

आरसीबीच्या संघासाठी डेल स्टेनने घेतलेला हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. आरसीबीचा स्टेन हा अनुभवी गोलंदाज असल्यामुळे पुढील हंगामात त्याची कमतरता कोणता खेळाडू भरून काढेल? हे आयपीएलच्या चौदाव्या हंगामात नक्कीच कळेल.



नुकतेच एक ट्विट (twitter post) स्टेनने केले आहे. त्याने ज्यात असे म्हटले आहे की, एक संदेश मी सर्वांना देऊ इच्छितो. आयपीएलच्या पुढील हंगामात मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी उपलब्ध नसेल. या कालावधीत मी दुसऱ्या स्पर्धेत खेळण्याचा विचार करत आहे. तसेच मला बंगळुरु टीम मॅनेजमेंटने समजून घेतले आणि सहकार्य केले. मी त्यासाठी आभारी आहे, अशा आशयाचे त्याने ट्विट केले आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमधून तो निवृत्ती घेत नसल्याचेही त्याने सांगितले आहे. आरसीबीने स्टनेच्या ट्विटला भावनिक उत्तर दिले आहे. संघात तुझी उणीव भासेल, असे आरसीबीच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून म्हटले गेले आहे.

------------------------------------

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग

2) IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता

3) तुम्ही ही गिझर वापरताय तर सावधान!

4) धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने केले वार

-------------------------------------

डेल स्टेनला आयपीएलच्या गेल्या हंगामात चांगली कामगिरी करता आली नाही. पण त्याला नेहमीच एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखले जाते. आयपीएलमध्ये डेल स्टेनने एकूण 95 सामने खेळले आहेत. यात त्याने 25.85 च्या सरासरीने आणि 6.91 या इकॉनॉमी रेटने एकूण 97 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, 8 धावा देऊन 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.