this-is-not-an-auction-for-sarpanch-it-is-an-auction

( real clear politics) राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत काही गावांत सरपंचाच्या पदाचा लिलाव करून बोली लावल्याची बातमी वाचली. वास्तविक पाहता हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazareयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'देशात लोकशाही यावी, या साठी 90 वर्षात लाखो लोकांनी जेलमध्ये जाऊन, भूमीगत राहून इंग्रजांच्या गोळ्या, लाठ्या-काठ्या खाऊन अनंत हाल अपेष्टा सहन केल्या. जुलमी, अन्यायी इंग्रजांना देशातून घालवायचे आणि आमच्या देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आणायची, असे त्यांचे स्वप्न होते. पण सरपंच पदाचा लिलाव म्हणजे त्या लोकशाहीचाच लिलाव आहे, देशात लोकशाही यावी, यासाठी अनेकांनी प्राणांचे बलिदान केले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले की काय, तसंच 70 वर्षात लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही का? असेही त्यांनी म्हटले आहे.

'पंचायत राज मजबूत व्हावे, ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांचे स्थान सर्वोच्च स्थान आहे. ग्रामसभा ही गावची संसद आहे. या घटकांनी एक दुसऱ्यांच्या विचाराने दिल्लीची संसद लोकसभा आणि राज्याची संसद विधानसभा मजबूत करावयाची आहे. कारण, आमदार आणि खासदारांना ग्रामसभा निवडून पाठविते. त्यासाठी सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीकोन असणारे चारित्र्यशील उमेदवार लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडून पाठवायचे आहेत'असंही अण्णा म्हणाले.

'ग्रामपंचायत सरपंच पदाचा लिलाव झाला, तर लोकसभा (real clear politicsआणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, ज्या आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठविले असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभीचारी लोक त्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसभांनी हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे', असंही अण्णा म्हणाले.

'दिल्लीची संसद लोकसभा किंवा राज्याची संसद विधानसभा ही लोकशाहीची पवित्र मंदिरे आहेत. त्यांचे पावित्र्य राहण्यासाठी ग्रामसभा, ग्रामपंचायत यांची फार महत्वाची जबाबदारी आहे. कारण ग्रामसभा ही सार्वभौम असून, स्वयंभू आहे. ग्रामसभा ग्रामपंचायतीला निवडून देते, अशा ग्रामपंचायत सरपंचाचा लिलाव होणे, हा लोकतंत्राचा लिलाव आहे. जागृत मतदार हा लोकशाहीचा आधार आहे' असं मतही अण्णांनी व्यक्त केले.