transgender meaning


बॉलिवूड इंडस्ट्रीला ग्लॅमरचे विश्व म्हणतात. प्रत्येकाने इथे आपली एक ओळख निर्माण केली आहे. मग ते कलाकार असो किंवा फॅशन डिझायनर. त्यात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपली ओळख आणि अस्तित्व (transgender meaning) बदललं. फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे जो आता सायशा झाला आहे. बॉबी डार्लिंग, गौरी अरोरा, अंजली धारीवाल, निक्की चावला सारखे कलाकार आहेत.सायशा- नवीन वर्षाच्या निमित्ताने स्वप्निल शिंदेने आपल्या जीवनाची नवीन सुरूवात केली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे आता सायशा झाला आहे.

स्वप्निलने करीना कपूर, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, सनी लिओनी, कतरिना कैफ आणि कियारा अडवाणी यांसारख्या अभिनेत्रींसोबत काम केलंय.बॉबी डार्लिंग - 'ताल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या बॉबी डार्लिंगला सगळेच ओळखतात. बॉबीने छोट्या पडद्यावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉबी डार्लिंगचे आधीचे नाव पंकज शर्मा आहे.

पंकजने २०१० मध्ये शस्त्रक्रियेनंतर आपले नाव बदलून पाखी शर्मा केले. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने आपले नाव पुन्हा एकदा बदलून बॉबी डार्लिंग केले.अंजली लामा - नेपाळची अंजली लामा ही तिच्या देशातील पहिली ट्रान्सजेंडर मॉडेल (transgender meaning) आहे. अंजलीचे बालपणीचे नाव नवीन वहिबा होते. पण शस्त्रक्रियेनंतक नाव बदलून अंजली लामा ठेवले.

अंजलीने पहिल्यांदा काठमांडूमध्ये मॉडेलिंगला सुरूवात केली. त्यावेळी गावातल्या एका व्यक्तीला कळून चुकले की अंजली एक ट्रान्सजेंडर आहे. त्या व्यक्तीने लगेच तिच्या कुटुंबाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबतचे सगळे नाते संपवले.निक्की चावला- निक्की चावलाने २००९ मध्ये लिंग परिवर्तन केले. निक्की ही दिल्लीची राहणारी असून खूप सुंदर आहे. तिच्याकडे पाहून असं कोणी म्हणणार नाही की ती ट्रान्सजेंडर आहे.

निक्कीच्या कुटुंबीयांनी लिंग परिवर्तनासाठी तिला संमती दिली नव्हती. तरीही निक्कीने त्यांच्या विरोधात जाऊन लिंग परिवर्तन केले.