the-woman-was-robbed-of

(Fraud) महिलेकडून दारु दूकान चालवण्यास घेतलेल्या व्यक्तीने त्या महिलेच्या धनादेशाचा वापर करुन सुमारे सव्वानऊ लाखाला गंडा Fraud घातल्याचा प्रकार इचलकरंजी इथं उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात इचलकरंजीतील राहुल केदार भोपळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

इचलकरंजीतील बावणे गल्लीत कोल्हापूरातील रेवती राहुल जाधव यांचे देशी दारूचे दुकान आहे. भरवस्तीतील हे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी मध्यंतरी जनआंदोलन झाल्यानं काही कालावधीसाठी हे दुकान बंद होतं. मात्र हे दुकान पुन्हा सुरू झालं आहे. त्या महिलेकडून राहुल भोपळे यानं हे दुकान चालवण्यासाठी घेतलं आहे. दुकानात लागणारी दारु भोपळे हा जाधव यांच्या नावावरच खरेदी करत होता. (Fraud) भोपळे यानं दुकानमालकाकडून एक धनादेशही घेतला होता. त्या आधारे त्यानं लाखो रुपयांची देशी दारु खरेदी केली होती. 

त्यापैकी सुमारे 9 लाख 29 हजार रुपये किंमतीची दारु त्यानं परस्पर विक्री करुन दुकानमालक महिलेला गंडा घातला होता. याप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी भोपळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागतच भोपळे यानं पलायन केलं असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.