(theft) इचलकरंजी दारु (Alcohol) पिण्यास पैसे हवेत यासाठी इंटरनेट केबलची चोरी करणार्‍या पोलिस रेकॉर्डवरील एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्निल चौधरी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहरात इंटरनेट केबल जोडणीचे काम करणार्‍या एका ठेकेदाराकडे स्वप्निल चौधरी हा कामास होता. त्या मक्तेदाराकडील सुमारे सात किलोमीटर लांबीची केबल चोरीस गेली होती. चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास असता केबलची चोरी स्वप्निल यानेच केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ठेकेदाराने या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली.

स्वप्निल हा सांगली येथील पंचशीलनगर येथे राहण्यास आहे. पोलिसांनी मक्तेदाराच्या मदतीने केबल टाकण्याचे काम असल्याचे कारण सांगून स्वप्निल याला बोलावून घेतले. (theft) त्यानुसार स्वप्निल इचलकरंजीत आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने आपण केबलची चोरी करून ती जयसिंगपूर येथील एकाला विकली असल्याची कबुली दिली आहे.