#SushantSinghRajput


सुशांत सिंग राजपूत (#SushantSinghRajput) सारखा एक उमदा स्टार काही महिन्यांपूर्वी या जगाला अलविदा म्हणत निघून गेला. पण त्याच्या खास चाहत्यांच्या मनात तो आजही जिवंत आहे. त्याचे चाहत्यांच्या मनातील स्थान अढळ आहे आणि राहील. आज  त्याची प्रचिती आली. आज सुशांतचा वाढदिवस ( #SushantBirthdayCelebration ) म्हटल्यावर चाहते अक्षरश: भावूक झालेत. इतके की, सुशांत परत ये, अशी आर्त हाक त्यांनी सोशल मीडियावर घातली. सुशांतवर प्रेम करणारा प्रत्येकजण चाहत्यांच्या या हृदय पिळवून टाकणार्‍या हाकेने भावूक झाला.

आज सकाळपासूनच सोशल मीडियावर @itsSSR #SushantSinghRajput #SushantBirthdayCelebration  ट्रेंड होत आहेत. जगभरातील चाहते त्याच्या आठवणीत ट्वीट करत आहेत.


‘परत ये, या जगाला तुझी गरज आहे,’ असे एका चाहत्याने लिहिले. अनेक चाहत्यांनी त्याला संगीतमय श्रद्धांजली वाहिली.


‘21 जानेवारी, बॉलिवूडच्या इतिहासात याआधी कोणत्याही कलाकाराच्या वाढदिवसाला इतकी उत्सुकता दिसली नाही,’असे एका युजरने लिहिले.

--------------------------------
Must Read


1) ठाकरे सरकारने आता घेतले 'हे' तीन महत्त्वाचे निर्णय

2) आठ जिल्ह्यात 5 ते 25 मार्चदरम्यान सैन्यभरती

3) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज ठाकरे म्हणाले…

--------------------------------

बहिणीनेही केली भावूक पोस्टसुशांतची (#SushantSinghRajput) बहीण श्वेता सिंग किर्ती हिने सुशांतसोबतचे अनेक फोटो शेअर करत, त्याच्या आठवणी जाग्या केल्यात. लव्ह यू भाई, तू माझा भाग आहेस आणि नेहमी राहशील, अशी इमोशनल पोस्ट तिने केली.

34 वर्षीय सुशांत गत 14 जूनला त्याच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडसह अख्ख्या देशाला मोठा धक्का बसला होता. सुशांतचा मृत्यू कशाने झाला, याचा तपास अद्यापही सुरू आहे. सीबीआय, ईडी, एनसीबी अशा यंत्रणांचा तपास सुरुच आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. रियाने सुशांतचा पैसा हडपला, त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला होता.