sunny leoneentertainment news- कधीकाळी पॉर्न स्टार राहिलेली सनी लिओनी आता बॉलिवूडच्या पॉप्युलर सेलिब्रिटींपैकी एक आहे. सनी आता तिचा जास्तीत जास्त वेळ मुंबईमध्ये घालवते. सनीला (sunny leone) तीन मुलं आणि तिन्ही मुलांना सांभाळून ती तिच्या प्रोफेशलन कमिटमेंट पूर्ण करते. सनीने एक अनाथ मुलगी निशाला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर तिच्या २ जुळ्या मुलांचा जन्म झाला.

सनी लिओनी नव्या वर्षाच्या निमित्ताने बोलताना म्हणाली की, 'मी कधीही विचार नव्हता केला की माझ्याकडे तीन मुलं असतील. मला वाटलं होतं की, हे हळूहळू होईल. मी विचार केला होता की, माझ्याकडे एक मूल असेल आणि नंतर दुसरं. पण असा अजिबात विचार नव्हता केला की, एकत्र तीन मुलं असतील'.

----------------------------------------

Must Read

1) BREAKING: UK च्या फ्लाइट्सबद्दल भारताचा मोठा निर्णय!

2) मोठी बातमी, संजय राऊत यांच्या पत्नीबद्दल ईडीने केला नवीन खुलासा

3) 'हा सरपंचपदाचा नसून लोकशाहीचा लिलाव', अण्णा हजारे संतापले

4) Whatsapp वर कुणी ब्लॉक केलंय? या साध्या ट्रिक्सनी काढा शोधून!

5) नवीन वर्षात ठाकरे सरकारचा कैद्यांना दिलासा

----------------------------------------

सनी लिओनी म्हणाली की, कामासोबत मुलं सांभाळणं जरा कठिण आहे. ती म्हणाली की, 'हो थोडं कठिण असतं. यात बराच वेळ टाइम मॅनेजमेंट करावं लागतं. आता जेव्हा मी माझ्या कामावर असते तेव्हा मुलांची आठवण येते. मी त्यांना सांगत असते की, मी काही कामासाठी बाहेर जात आहे. पण मी डीनरसाठी घरी येईन'. (entertainment news)


सनी लिओनी (sunny leone) पुढे म्हणाली की, 'मला वाटतं कोरोना आल्यानंतर लोकांमध्ये आपल्या परिवारातील सदस्य दूर झाल्याने चिंता वाढली आहे. मलाही माझ्या मुलांपासून दूर गेल्यावर अशीच चिंता वाटत असते. पण ते अजून लहान आहेत. आणि इतर गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष लावलं जाऊ शकतं.

दरम्यान, सनी लिओनी येत्या वर्षात वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. तिने काही दिवसांपूर्वीच विक्रम भट्ट यांच्यासोबतच्या सिनेमाची घोषणा केली आहे. तसेच आणखीही काही सिनेमात ती धमाका करताना दिसत आहे. ती एका वेबसीरीजमध्येही दिसणार आहे.