State Bank of India


देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ( State Bank of India) आपल्या लाखो ग्राहकांना चांगली बातमी दिली आहे. एसबीआयने निवडक मॅच्युरिटी पिरियडच्या व्याज दरात वाढ केली आहे. बँकेने एफडी (fd interest rate) वर व्याज एक ते दोन वर्षांपर्यंत 10 बेसिस पॉईंटपर्यंत वाढविले आहे. नवीन दर 8 जानेवारी 2021 पासून लागू झाले आहेत. एसबीआयने सांगितले आहे की, 2 कोटींच्या खाली किरकोळ एफडीवर 8 जानेवारीपासून हे दर लागू झाले आहेत. त्यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी व्याज दरात सुधारणा करण्यात आली होती.

नवीन एफडी दर

– 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीमध्ये 2.9 टक्के दराने व्याज मिळेल.

– 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 3.9 टक्के दराने व्याज दिले जाईल.

– 180 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी एफडीवर 4.4 टक्के दराने व्याज दिले जाईल.

– 211 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी एफडी वर 4.4 टक्के दराने व्याज मिळेल.

– 1 वर्षापासून 2 वर्षाखालील एफडीला मिळणार 5% व्याज.

– 2 ते 3 वर्षांखालील एफडीला 5.1 टक्के दराने व्याज मिळेल.

– 3 ते 5 वर्षांच्या एफडीमध्ये 5.3 टक्के दराने व्याज मिळणार.

– 5 वर्ष आणि 10 वर्षाच्या एफडीला 5.4 टक्के दराने व्याज मिळेल.

--------------------------------------------------------------

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

------------------------------------------------------------ज्येष्ठ नागरिकांसाठी

ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलल्यास त्यांना सामान्य ग्राहकांपेक्षा 50 बेसिस पॉईंट अधिक व्याज मिळते. बँकेने केलेल्या दुरुस्तीनुसार ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते दहा वर्षे मुदतीच्या एफडीवर ( State Bank of India) सुमारे 3.4 टक्के ते 6.2 टक्के व्याज मिळेल.

– 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.4%

– 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के

– 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 4.9%

– 211 दिवसांपेक्षा 1 वर्षापेक्षा कमी एफडीवर 4.9%

– 1 ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.5%

– 2 ते 3 वर्षांखालील एफडीवर 5.6%

– 3 ते 5 वर्षांखालील एफडीवर 5.8 %

– 5 वर्ष आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.2%