srishti-to-be-chief-minister-one-day

(Movies) अनिल कपूर (Anil Kapoorयांचा नायक हा चित्रपट सर्वांनीच पाहिला असावा. पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारणारे अनिल कपूर टीव्ही मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचे पत्र साकारणाऱया अमरीश पुरी यांना झोंबणारे प्रश्न विचारतात, यावर ते एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊन काम समजून घेण्याचे आव्हान अनिल कपूर यांना दिले जाते. आता दृश्य फिल्मी असले तरीही कथानक वेगळे आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंदसिंग रावत यांनी राष्ट्रीय बालिका दिनी हरिद्वार येथील विद्यार्थिनी सृष्टी गोस्वामी यांना 24 जानेवारी रोजी एक दिवसाचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

एक दिवसाच्या कार्यकाळात सृष्टी राज्याच्या विकासकामांचा आढावा घेणार आहे. (Moviesहरिद्वारच्या दौलतपूर गावाची रहिवासी सृष्टी बीएससी ऍग्रिकल्चरचे शिक्षण घेत आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विद्यार्थिनीला अशाप्रकारे एक दिवसाचे मुख्यमंत्री भूषवू देण्याची ही पहिलीच वेळ आहे.