(whatsapp) व्हॉट्सप आज बहुतांश स्मार्टफोनधारकांच्या (smart phone users) मोबाईलमध्ये (mobile) हमखास असणारं ऍप. हे आजच्या काळातल्या संवादाचं सोपं आणि इंटरेस्टिंग माध्यम बनलं आहे.

या माध्यमात नको असणाऱ्या व्यक्तीला ब्लॉक (block) करण्याचीही सोय आहे. मात्र आपल्याला कुणी ब्लॉक केलंय हे यात कळत नाही. हे समजून घ्यायचं असेल, तर काही सोप्या युक्त्या (tricks)वापरता येतील. चला, समजून घेऊ की ब्लॉक कुणी केलंय ते ओळखायचं कसं

1) ब्लॉक केलं असेल तर प्रोफाईल पिक दिसणार नाही - तुम्हाला कुणी व्हॉट्सपवर ब्लॉक केलं असेल, तर तुम्ही चॅट बॉक्स उघडा. त्या व्यक्तीची प्रोफाईल पिक्चर दिसत नसेल तर तिनं तुम्हाला ब्लॉक केलेलं असू शकतं. अनेकदा त्या व्यक्तीचा जुना, पूर्वीचा फोटो दिसत असेल तरीही ब्लॉक केलेलं असण्याची शक्यता असते.

2) ऑनलाईन स्टेटस दिसणार नाही - एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर त्याचं ऑनलाईन स्टेट्स तुम्ही पाहू शकणार नाही. तुम्हाला कुणी ब्लॉक केल्याचा संशय असेल तर यामाध्यमातून तुम्ही ते जाणून घेऊ शकता.

3) व्हॉट्सप कॉलचं उत्तर मिळणार नाही - एखाद्यानं तुम्हाला ब्लॉक केलं (whatsapp)  असेल तर त्याला व्हॉट्सअप कॉल केल्यावर साहजिकच तो उचलला जाणार नाही. अर्थात, कॉलचं उत्तर न मिळाल्यास ही फक्त एक शक्यता असू शकते. तुम्हाला कॉल केल्यावर बेल वाजताना ऐकू येईल मात्र कॉल अजिबात उचलला जाणार नाही.

4) मेसेज पाठवल्यावर डबल मार्क दिसणार नाही - एखाद्या व्यक्तीला तुम्ही मेसेज केला तर व्हॉट्सपवर डबल मार्क किंवा वाचल्यावर ब्लू मार्क दिसतो. मात्र व्यक्तीनं तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर डबल मार्क अजिबातच दिसणार नाही कारण त्या व्यक्तीला तुमचा मेसेज पोचण्याचे मार्ग बंद झालेले असतील.