shocking-virar-city-near-mumbai-a-man-stabbed-himself

(Crime) कर्जबाजारीपणाला (Debt bondage) कंटाळून एका व्यक्तीने स्वत:वरच धारदार शस्त्राने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. शहरातील नाना-नाणी पार्क येथील गणेश टॉवर परिसरातील जंगलात हा संपूर्ण प्रकार घडला. गणेश टॉवरच्या मागील भागात आत्महत्येचा प्रयत्न करणारा व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आला. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी माहिती दिली.

राकेश खैरे असं या इसमाच नाव असून तो एका गॅस एजन्सीमध्ये काम करतो, अशी माहिती आहे. आज सकाळी नाना नाणी पार्क मागील जंगलाच्या पायवाटेत वाटसरूंना राकेश अर्धमेल्या अवस्थेत आढळून आला.

राकेशच्या दोन्ही हाताच्या मनगटावर चाकूने वार केले असून गळ्यावर सुद्धा वार केले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करण्याचं पाऊल उचल्याचं त्याने पोलिसांना दिलेल्या (Crime) जबानीत सांगितल्याची माहिती पोलीस निरीक्षक वराडे यांनी दिली आहे.

दरम्यान, या जंगल परिसरात सदर इसम रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. राकेशने खरंच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे की या प्रकरणाला दुसरीही काही बाजू आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.