shivsenapolitics news of india- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार  (MVA Goverment)स्थापन केले. स्थानिक पातळीवर सुद्धा  तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले. पण भिवंडीपाठोपाठ मीरा भाईंदरमध्ये (mira bhayandar) फोडोफोडीचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेच्या (politics party) नेत्याने पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेचे नेते उपशाखाप्रमुख मेंनेंजीस सातन यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

मीरा भाईंदर परिसरातील काशीमिरा भागात मेंनेंजीस सातन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत उपशाखाप्रमुख म्हणून काम पाहिले होते.पण अचानक सातन यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यानंतर सातन यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.

--------------------------------------

Must Read

1) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

2) आमदाराच्या मुलीच्या लग्नात कलेक्टरांचं मारलं पाकीट

3) बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री

4) धक्कादायक! पोलीसच करत आहेत गुंडागर्दी, VIDEO

5) सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून

6) अबब... ! करीना कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण

--------------------------------------

'शिवसेनेचे (politics party) आमदार प्रताप सरनाईक यांच्या विश्वासावर आपण शिवसेनेत प्रवेश केला होता. पण महापालिकेतील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या कामाकडे दुर्लक्ष केले. सेनेत राहून जनतेची काम होत नव्हती, त्यामुळे पुन्हा स्वगृही परण्याचा निर्णय घेतला', असं यावेळी सातन म्हणाले.