politics news- मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर (एक्सप्रेस-वे वरील) बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ (viral video) सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी या प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी केलेली असतानाच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी हाच व्हिडीओ शेअर करत, शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रामध्ये दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?, असा प्रश्न विचारला आहे.

निलेश राणे यांनी व्हायरल झालेला व्हिडीओ (viral video) आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करत या प्रकरणासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. “चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.


-------------------------------------

Must Read

1) ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना दणका

2) “आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे का गप्प आहेत”

3) इचलकरंजीत धारदार शस्त्राने युवकाचा निर्घृण खून

-------------------------------------

व्हिडीओमध्ये रात्रीच्यावेळी वाहतुककोंडीमध्ये एक कारचालक बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गाडीच्या मागील बाजूस शिवसेनेची (shivsena) ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या भगव्या रंगाच्या नकाशावरील वाघ असं चिन्ह दिसत आहे. व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसून येत आहे.