entertainment newsentertainment news-  अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) नेहमीच सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे जो पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओ शिल्पाचा फिटनेसचा नाही किंवा तिचे बोल्ड फोटोही नाहीत पण तरीही या व्हिडीओला अवघ्या एका तासामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज (viral on social media) आले आहेत.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची धाकटी मुलगी समिशा गाणं गाताना दिसत आहे. वडील राज कुंद्राप्रमाणे ती गाण्याचा प्रयत्न करत आहे. यातला तिचा निरागसपणा पाहून तिचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. समिशा गाणं म्हणत असताना तिथे असलेली मंडळीही तिच्या क्यूट गाण्यावर हसत आहेत काही कॉमेंट्स करत आहेत. 

----------------------------------------

Must Read

1) आज कोरोना लसीसंदर्भात होणार मोठा निर्णय?

2) Amazon-Flipkart वर कारवाई करणार ED आणि RBI, मोदी सरकारचे निर्देश

3) महत्वाची बातमी : परदेशातील उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

5) 2021 हे आरोग्यप्रश्न सोडवण्याचे वर्ष

--------------------------------------

तिला पाहिल्यानंतर इतकं क्यूट कोणी कसं असू शकतं असाच प्रश्न पडतो. शिल्पा शेट्टीने हा व्हिडीओ शेअर करत त्यामध्ये कॅप्शन दिलं आहे, ‘काळजी करु नका बिनधास्त गा... समिशाचं म्हणणं आहे की राज कुंद्रा तुम्ही गाणं म्हणणं थांबवलं पाहिजे’ असं म्हणत तिने पतीची फिरकी घेतली आहे. शिल्पा शेट्टीने सर्व चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. (viral on social media) सरोगसीद्वारे झाला शिल्पाच्या मुलीचा जन्म

15 फेब्रुवारी 2020 मध्ये समीशाचा जन्म झाला. तिच्या जन्माच्या आधी शिल्पाला काही प्रेग्नंसीशी निगडित समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे समीशाचा जन्म सरोगसीतून झाला आहे. तिचा जन्म झाल्यानंतर जवळ जवळ 7 - 8 महिने शिल्पाने समीशाचा चेहरादेखील मीडियासमोर येऊ दिला नव्हता. शिल्पा तिला प्रचंड जपते. समीशाच्या जन्मानंतर नवरात्रीमध्ये तिने कुमारिकांचं पूजनही घरी केलं होतं.