shilpa shetty

अभिनयासोबतच आपल्या फिटनेससाठी कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. गेल्या बऱ्याच काळापासून शिल्पा रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, आता पुन्हा एकदा ती प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. शिल्पा लवकरच ‘हंगामा 2’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील टायटल सॉन्ग नुकतंच चित्रित झालं असून याचे फोटो शिल्पाने इन्स्टाग्रामवर (instgram account) शेअर केले आहेत.

‘हंगामा 2’ हा चित्रपट ‘हंगामा’ या पहिल्या चित्रपटाचा सिक्वल आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाच शिल्पा शेट्टीसोबत कलाविश्वातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी झळकणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं टायटल सॉन्ग चित्रित झालं आहे. या गाण्यात शिल्पा अभिनेत्री हेलन यांच्या रुपात दिसून येत आहे.


--------------------------------

Must Read

📺 फक्त ११३० रुपयात घरी घेऊन जा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही

📲 सर्व मेसेजिंग Apps आता इथे एकाच ठिकाणी मिळणार

🏏 बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिके

--------------------------------

‘पुन्हा एकदा सेटवर. कोविड टेस्टेड. ‘ असं कॅप्शन देत शिल्पाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच कलाविश्वात पुन्हा कमबॅक करत असल्याचं तिने जाहीर केलं (instgram account) आहे.

दरम्यान, ‘हंगामा 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला २०२० मध्ये सुरुवात होणार होती. मात्र, करोना काळामुळे हे चित्रीकरण लांबणीवर पडलं.