Sharad Pawar

केरळातील एलडीफ (LDF) सरकार आणि केरळ राष्ट्रवादीतील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल येत्या आठवड्यात केरळचा दौरा करणार (politics term) आहेत. केरळ प्रदेश राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत पवार सहभागी होण्याची शक्यता असून, यावेळी राष्ट्रवादीतील दोन्ही गटांशी ते चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि केरळचे परिवहनमंत्री ए के ससिंद्रम विरुद्ध केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पी पीठंबरन यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. पीठंबरन य़ांना आमदार मणी कप्पन यांचा पाठिंबा आहे. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी एलडीएफ सोबत राहायचे की युडीएफसोबत (UDF) जायचे, यावरुन सध्या वाद सुरु आहे. कोणताही निर्णय घेतला तरी पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. केरळमध्ये राष्ट्रवादीच्या चार जागा आहेत, मात्र त्या जागा यावेळीही राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता कमी आहे. यातल्या पाला जागेसाठी कप्पन हे आग्रही आहेत. मात्र ही जागा काँग्रेसला मिळण्याचा दावा काँग्रेसी नेत्यांनी केल्याने, कप्पन गट नाराज आहे.

--------------------------------------

Must Read

1) कचरा डेपोप्रश्‍नी इचलकरंजीत आंदोलन

2) एकच चर्चा, हवा फक्त कोल्हापूरचीच...!

3) "सीरम'ला पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

--------------------------------------

मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी याबाबत राष्ट्रवादीतील दोन्ही गटांशी चर्चा केली, मात्र त्यानंतरही तोडगा निघू शकलेला नाही. पाला विधानसभा जागेवर काँग्रेसने केलेल्या दाव्यानंतरही सीपीएम गप्प का, असा सवाल कप्पन यांनी केला आहे. तर एकट्या पाला जागेसाठी एलडीएफला सोडणे, ही आत्महत्या ठरेल असे सीसंद्रम यांचे मत आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत प्रदेश राष्ट्रवादीचा निर्णय काहीही झाला तरी सीसंद्रम हे एलडीएफसोबतच राहतील, असा शब्द त्यांनी दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान बुधवारी ससींद्रमतर गुरुवारी पीठांबरन आणि कप्पन यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून, शरद पवारांचा त्यांनाच पाठिंबा असल्याचा दावाही केला आहे. ससींद्रम यांच्या मते केरळमधील वावातरण सध्या डाव्यांसाठी पोषक असून, यूडीएफ सोबत जाण्याची आवश्यकता नाही. आता शरद पवार यांना दौऱ्यात पक्षांतर्गत वाद मिटवणे आणि आगामी विधानसभेत कुणासोबत जायचे, या दोन्हींचा निर्णय करावा लागणार आहे.