sharad pawarpolitics news of Maharashtra- भाजपचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्यामुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA Goverment) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'माझी सुद्धा सुरक्षा (security) कमी करा' अशी गुगली टाकून भाजप नेत्यांना गारद केले आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील माजी मंत्री आणि विरोधकांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपने आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी 'माझ्या सुरक्षेत कपात करावी' अशी मागणीच केली आहे. 'इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे, तर माझी सुद्धा सुरक्षा कमी करावी', अशी मागणी पवार यांनी केली आहे.

--------------------------------------------------------------

Must Read 

1) विद्यापीठातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

2) राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत कॅबिनेट मंत्र्यांची महत्त्वपूर्ण माहिती

3) भारताने केलेल्या Air Strike मध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू

4) एकटी मुलगी 4 दरोडेखोरांशी भिडली

5) Marathi Joke : महापावसाळी आघाडी

------------------------------------------------------------

सुनेत्रा पवार यांना एक्स दर्जाची सुरक्षा

दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकमध्ये कोण कोणत्या नेत्यांची सुरक्षा वाढवायची आणि कपात करायची याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

मात्र, सुनेत्रा पवार यांना विशेष वेगळी सुरक्षा (security) देण्यात आली नाही. उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांना सुरक्षा देण्यात आली आहे. यापूर्वीही उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नींना सुरक्षा पुरवण्यात आली होती, असं पवार कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडी काढली

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडी काढण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल असताना सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे.  तर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना वाय सुरक्षा दिली आहे ती आधी वाय प्लस सुरक्षा होती.

या नेत्यांना आणि दिग्गजांना पुरवण्यात आली सुरक्षा

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेसचे मंत्री  विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर,दिलीप वळसे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

आमदार वैभव नाईक हे नारायण राणे यांचे विरोधक आहे म्हणून त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांना प्रथमच सुरक्षा पुरवण्यात आली आहे.  तसंच कोल्हापूरमध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवल यांची सुरक्षा वाढवली आहे.