t natrajan cricketer


ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्नने (Shane Warne) ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या (test cricket) दिवशी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. इशाऱ्या इशाऱ्यांमध्येच शेन वॉर्नने भारताचा फास्ट बॉलर टी.नटराजन (T Natrajan) याच्यावर स्पॉट फिक्सिंगचे (spot fixing) आरोप केले आहेत. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाच्या चॅनलवर कॉमेंट्री करताना नटराजनकडून टाकण्यात आलेल्या नो बॉलवर संशय घेतला (cricket news) आहे. 

नटराजनने ब्रिस्बेन टेस्टमध्ये 7 नो बॉल टाकले. या बॉलवर शेन वॉर्नने वादग्रस्त वक्तव्य केलं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची बॉलिंग सुरू असताना कॉमेंट्री करताना शेन वॉर्न एलन बॉर्डर यांना म्हणाला, नटराजनने जे 7 नो बॉल टाकले आहेत, त्यातले 5 नो बॉल पहिल्या बॉलवरचेच आहेत.

-------------------------------------

Must Read

1) कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच

2) इचलकरंजीतील स्वच्छतागृहांमध्ये सुविधांची वानवा

3) तीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन आणि....

-------------------------------------

'नटराजनच्या बॉलिंगवर मला काही वेगळ्या गोष्टी दिसल्या आहेत. नटराजनने जे 7 नोबॉल टाकले, ते खूप मोठे होते. यातले पाच नो बॉल पहिल्या बॉलवर आले आणि त्याचा पायही क्रीजच्या खूप बाहेर होता. आम्ही सगळ्यांनी नो बॉल टाकले आहेत, पण 5 नो बॉल पहिल्या बॉलवर फेकणं खूपच रोचक आहे,' अशी प्रतिक्रिया शेन वॉर्नने दिली.

शेन वॉर्नने (Shane Warne)  इशाऱ्या इशाऱ्यांमध्येच नटराजनची तुलना पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरसोबत केली आहे. 2010 साली लॉर्ड्स टेस्टमध्ये मोहम्मद आमिरने मोठा नो बॉल टाकला होता. यानंतर मोहम्मद आमिर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळला (cricket news) होता.

नटराजनचं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण

ब्रिस्बेन टेस्टमधूनच नटराजनने टेस्ट क्रिकेटमध्ये (test cricket) पदार्पण केलं आहे. नटराजनने पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट घेतल्या. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच वनडे आणि टी-20 सीरिजमध्येही त्याने पदार्पण केलं होतं. एका वनडेमध्ये त्याने 2 विकेट तर टी-20 सीरिजमध्ये त्याने 3 विकेट घेतल्या. एकाच दौऱ्यात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा नटराजन पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.