State Bank of India

भारतीय स्टेट बँक (State Bank of India) ने 1 जानेवारी 2021 पासून चेक पेमेंटसाठी एक नवी सिस्टम लागू केली आहे. ज्यानुसार चेकद्वारे 50,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी आवश्यक माहिती दुसर्‍यांदा कन्फर्म करण्याची आवश्यकता आहे. नवी पॉझिटिव्ह पे सिस्टम  (positive pay system) 1 जानेवारीपासून सक्रिय झाली आहे.

एसबीआयने म्हटले आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आम्ही अधिक सुरक्षेसाठी 01/01/2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम (पीपीएस) ची सुरूवात करत आहोत. यामध्ये चेक जारी करणार्‍यास पेमेंटच्यावेळी आता खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेक रक्कम, नाव इत्यादी माहिती द्यावी लागेल. असे केल्याने फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.

------------------------------------

Must Read

1) कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग

2) IndvsAus : रोहित शर्मासह या ४ खेळाडूंवर कारवाईची शक्यता

3) तुम्ही ही गिझर वापरताय तर सावधान!

4) धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने केले वार

-------------------------------------

एसबीआयने याबाबत ट्विट करत म्हटले आहे की, चेकच्या माध्यमातून केलेला तुमचा व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी एसबीआय 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टमची (positive pay system) सुरूवात करत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या एसबीआय शाखेशी संपर्क करा. एसबीआयने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, त्यांनी पॉझिटिव्ह पे सिस्टमचा ऑपशन निवडावा. कोणत्याही प्रश्नासाठी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (rbi) चेक-आधारित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून फसवणुकीची प्रकरणे कमी करता येतील. केंद्रीय बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टमच्या सुविधेबाबत आपल्या ग्राहकांमध्ये योग्य जागृतता निर्माण करण्याचा सुद्धा सल्ला दिला आहे.

पॉझिटिव्ह पे सिस्टम अंतर्गत चेक जारी करणारा व्यक्ती बँकेला एसएमएस, इंटरनेट बँकिंग, मोबाइल अ‍ॅप, एटीएम इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकसंबंधी काही आवश्यक माहिती देईल. ही सुविधा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे विकसित केली जात आहे.