(Election) तालुक्‍यातील 104 ग्रामपंचायतींपैकी 17 ग्रामपंचायती (Gram Panchayatबिनविरोध, तर 30 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्याचे काल अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. दरम्यान, एकूण 1024 जागांपैकी 246 उमेदवार बिनविरोध झाले आहेत, तर 778 जागांसाठी 1662 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतीसह 104 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी अर्ज दाखल माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रणधुमाळीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये तालुक्‍यातील उंडाळे या मोठ्या ग्रामपंचायतीसह कामथी, किरपे, येणके, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, म्हारुगडेवाडी, टाळगाव, भुरभुशी, अंबवडे, खोडजाईवाडी, पाचुंद, गोटे, वसंतगड, हणबरवाडी, विरवडे या 17 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

-----------------------------------------
Must Read

1) महाडिक यांनी आता भाजपमध्येच राहावे ; गृहराज्यमंत्री सतेज पाटील
2) इचलकरंजी,जयसिंगपुरात जुगार खेळणार्‍या 22 जणांवर गुन्हा
3) बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडणार
4) कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल - रोहित पवार
5) दबंग सलमान खानसोबत तिघांविरोधात FIR दाखल
6) OMG! दीपिका पादुकोणने बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत पकडले होते रंगेहाथ

-----------------------------------------

तर तालुक्‍यातील हजारमाची, शहापूर, म्हासोली, गमेवाडी, भोळेवाडी, शेवाळवाडी-म्हासोली, सवादे, शेवाळवाडी-उंडाळे, घोगाव, शिवडे, भवानवाडी, हरपळवाडी, आबईचीवाडी, वारुंजी, भरेवाडी, (Election) काले, खुबी, शेळकेवाडी-म्हासोली, खराडे, चौगुलेमळा, गोळेश्वर, वाठार, कोळे, बामणवाडी, आकाईचीवाडी, भुयाचीवाडी, वाघेरी, गोवारे, कोडोली, नांदलापूर या 30 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी, तर काही ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे.