शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस आली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ऐन थंडीत गरामगरमीचं झालं आहे. राजकीय फायद्यासाठी ED, CBI, इन्कमटॅक्स यासारख्या संस्थांचा वापर होत असल्याचं शिवसेनेने अनेकदा बोलून दाखवलंय. दरम्यान वर्षा राऊत यांना ED नोटीस आल्यानंतर संजय राऊत प्रचंड आक्रमक झालेत. यानंतर आज संजय राऊत यांनी आता निर्वाणीचा इशारा दिलाय. आता पुरे झालं, आता हे सिद्ध करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवा असं संजय राऊत म्हणालेत. राऊतांनी याबाबतचं एक ट्विट केलंय. 


-----------------------------------------

Must Read

1) कोल्हापुरातील संवेदनशील 80 गावांत कडेकोट बंदोबस्त

2) शिवसेनेला रोखण्यासाठी नवी सत्ता समीकरणे?

3) महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडा

4) पुणेकरांना खूशखबर,PMPMLच्या ताफ्यात 150 इलेक्ट्रिक बसेस

5) पोलीसदादांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले महत्त्वाचे पाऊल

-----------------------------------------


 

संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "माझ्या परिवाराला ED नोटीस आल्याचं सार्वजनिक झाल्यानंतर अचानक काही गोदी मीडियामधील कमळं फुलू लागलीत. मात्र राजकीय सूड उगवण्यासाठी पिंजऱ्यातील पोपटांना कशा प्रकारे सोडलं जातं हे सर्वांना ठाऊक आहे. पीएमसी आणि एचडीआयएल घोटाळ्याशी माझ्या कुटुंबाचे नाव खोडकरपणे जोडले जात आहे. हे सिद्ध करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. आता पुरे झालं! समझनेवाले को इशारा काफी है."

दरम्यान, वर्षा राऊत यांना काल ED कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स मिळाला होता. यानंतर आम्ही ED कडे चौकशीसाठी हजर राहण्याआधी अधिकचा वेळ मागितला आहे, असं संजय राऊतांनी स्वतः सांगितलं होतं. यानंतर आता पाच जानेवारीला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं आहे असं समजतंय.