jewellerycrime news- माधवनगर येथे दुकानात झाटलोट करणार्‍या सराफाला पैसे पडल्याचे सांगून त्याची 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने (jewellery) असलेली बॅग लंपास करण्यात आली. रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे.

दत्ताजी रघुनाथ साळुंखे (वय 55, रा. घनशामनगर) यांचे सागर ज्वेलर्स नावाचे दुकान माधवनगरमधील मुख्य रस्त्यावर आहे.रविवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असेलली दागिन्यांची (jewellery) बॅग दुकानच्या काऊंटरवर ठेवली होती. ते दुकानासमोर झाडलोट करत असताना दोघेजण दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी साळुंखे यांना तुमचे पैसे पडले आहेत असे सांगितले.

---------------------------------

Must Read

1) महाराष्ट्रातील आणखी एका बँकेचा परवाना रद्द, RBI ची मोठी कारवाई

2) “शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?”

3) Bigg Boss14 :- राखी सावंतचा बचाव करणं सलमानला पडलं भारी

---------------------------------

साळुंखे ते पाहण्यासाठी गेल्यानंतर एकाने त्यांची काऊंटरवर ठेवलेली दागिन्यांची बॅग लंपास केली. त्यानंतर दोघेही चोरटे दुचाकीवरून भरधाव वेगाने निघून गेले. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजद्वारे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत