samsung tv


सॅमसंग (samsung) या भारताच्‍या सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने देशभरातील सर्व ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेलर्समध्‍ये ५५ इंच व त्‍यावरील आकाराच्‍या टेलिव्हिजनच्‍या प्रिमिअम रेंजवर आकर्षक सॅमसंग बिग टीव्‍ही ऑफर्सची घोषणा केली आहे. सॅमसंग बिग टीव्‍ही (samsung tv)डेजदरम्‍यान ऑफर्स ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वैध असतील.

ग्राहक मोठ्या आकाराच्‍या सॅमसंग टीव्‍ही - ५५ इंच, ६५ इंच, ७५ इंच, ८२ इंच आणि ८५ इंच क्‍यूएलईडी टीव्‍ही, क्रिस्‍टल ४के यूएचडी, क्‍यूएलईडी ८के टीव्‍हींच्‍या खरेदीवर खात्रीदायी लाभांसह अद्वितीय ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. तसेच, ग्राहक जवळपास २० टक्‍के कॅशबॅक आणि विस्‍तारित वॉरण्‍टी ऑफर्ससह १,९९० रूपये इतक्‍या कमी ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात.

--------------------------------------

Must Read

1) एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

2) आमदाराच्या मुलीच्या लग्नात कलेक्टरांचं मारलं पाकीट

3) बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री

4) धक्कादायक! पोलीसच करत आहेत गुंडागर्दी, VIDEO

5) सोन्याची तस्करी चक्क अंडरवेअरमधून

6) अबब... ! करीना कपूर आहे इतक्या कोटींची मालकीण

--------------------------------------

या कालावधीदरम्‍यान ग्राहकांना ६५ इंच क्‍यूएलईडी टीव्‍ही आणि ७५ इंच क्रिस्‍टल ४के यूएचडी टीव्‍हींवर २२,९९९ रूपये किंमत असलेला सॅमसंगचा गॅलॅक्‍सी A51 स्‍मार्टफोन (smartphone) मिळेल. तसेच ग्राहकांना ५५ इंच क्‍यूएलईडी टीव्‍ही आणि ६५ इंच क्रिस्‍टल ४के यूएचडी टीव्‍हींवर (samsung tv) १८,९९९ रूपये किंमत असलेला गॅलेक्‍सी A31 स्‍मार्टफोन मिळेल.

७५ इंच, ८२ इंच व ८५ इंच आकाराच्‍या क्‍यूएलईडी टीव्‍ही खरेदी करणा-या ग्राहकांना निवडक टीव्‍ही मॉडेल्‍सवर ४८,९९० रूपये किंमत असलेला साऊंडबार एचडब्‍ल्‍यू-क्‍यू८००टी किंवा ९९,९९० रूपये किंमत असलेला साऊंडबार एचडब्‍ल्‍यू-क्‍यू९००टी मिळेल.