sakshi-dhoni-shares-a-13-year-old-throwback-photo-with-ms-dhoni

(social media) लोकप्रिय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सोशल मीडियावर तसा खूप सक्रिय नसतो. याउलट त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) मात्र विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कमालीची सक्रिय असते.

साक्षी धोनी इन्स्टाग्रामवर (Instagram) सतत फोटो (photo) आणि व्हिडीओ (video) शेअर करत असते. साक्षीनं 10 जानेवारी 2012 चे दोन फोटोज पोस्ट केले आहेत. दोन्ही फोटोमध्ये साक्षी आणि महेंद्रसिंग धोनी दिसतात. दोन्ही फोटोमध्ये जमीन आस्मानाचं अंतर आहे. नीट निरखून पाहिलं तर दिसेल, की दोन फोटोंमध्ये तब्बल 13 वर्षांचं अंतर आहे.

पहिला फोटो 2008 सालचा आहे. दुसरा फोटो आता काही काळापुर्वी काढलेला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये साक्षीनं लिहिलंय, '2008... आणि त्यानंतर (social media) अनेक वर्षांनी' साक्षीनं या फोटोला timeaftertime आणि flashback वरसुद्धा शेअर केलं आहे. वर्ष 2008 मध्ये साक्षी आणि धोनीचं लग्न झालं नव्हतं. दोघं 4 जुलै 2010 ला डेहराडून इथं लग्नबंधनात बांधले गेले.

----------------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीच्या दौरावर दोन गवे

2) पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

3) मनसेचे बाळा नांदगावकर 'ठाकरे सरकार'वर संतापले

----------------------------------------------

धोनीनं 2004 मध्ये मँचेस्टरमध्ये बांगलादेशविरुद्ध वनडे क्रिकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. धोनीनं पुढच्या वर्षी 2005 मध्ये चेन्नईमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या मॅचमधून टेस्टमधील करियर सुरू केलं. 1 डिसेंबर 2006 ला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच खेळत धोनीनं टी 20 क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता.

साक्षीची ही पोस्ट थोड्याच वेळात व्हायरल झाली. एका तासातच पोस्टला जवळपास 3 लाख लोकांनी लाईक केलं. तीन हजारांहून जास्त कमेंट्सही तिथं आल्या. फोटो लाईक करणाऱ्यांमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. साक्षीनं याआधी 30 डिसेंबरलाही असाच एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला होता. त्यात साक्षी आणि धोनी अनेक लोकांसह डिनर करत होते.