ritesh deshmukh


बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांनी ट्विट करुन आपल्या चाहत्यांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी सायबर क्राइम (cyber crime) सेलच्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेता रितेश देशमुख याने लोकांना नवीन सायबर फसवणूकीबद्दल इशारा दिला, ज्यामध्ये बहुतेक सेलिब्रिटी खात्यांना टार्गेट केले जात आहे. आणि लोक या फसवणुकीला तेव्हाच बळी पडत आहेत जेव्हा ते पेज वरील लिंक ला क्लिक करत आहेत. रितेशने ट्विट केले की, “मला हे इन्स्टाग्रामच्या (instagram) थेट संदेशात आढळले हॅशटॅगसायबरफ्रॉड हॅशटॅगवेयर.”

-------------------------------------------

Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------

अभिनेत्याने पोस्ट केलेल्या या संदेशाच्या स्क्रीनशॉट मध्ये लिहील आहे कि , “आपल्या इनस्टाग्राम (instagram खात्यावरील एका पोस्टने कॉपीराइटच उल्लंघन झाले आहे आणि हे जर आपल्याला चुकीचे वाटत असेल तर आपण यावर अभिप्राय द्या, अन्यथा आपले खाते 24 तासांच्या आत बंद होईल. आपण खालील लिंक वर क्लिक करून आपला अभिप्राय देऊ शकता. “असे त्या स्क्रीनशॉटमध्ये लिहिले होते

रितेशने एका वेगळ्या ट्वीटमध्ये लोकांना याबद्दल सतर्क राहण्यास सांगितलं (cyber crime) आहे. मला हि असा एक थेट मेसेज मिळाला आहे. पण सुदैवाने मी दिलेल्या लिंकवर क्लिक केले नाही. अलीकडेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींचे सायबर फसवणूकीचे प्रकार समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांचे इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक अकाउंट्ला लक्ष्य केले जात आहे. यात चित्रपट निर्माते आनंद एल. राय, अभिनेते विक्रांत मस्से आणि उर्मिला मातोंडकर, कोरियोग्राफर-दिग्दर्शक फराह खान आणि गायिका आशा भोंसले आणि अंकित तिवारी यांचा समावेश आहे.