rishabh pantcricket news- भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद १६६ धावांपर्यंत मजल मारली. पावसाच्या व्यत्ययामुळे दिवसभरात केवळ ५५ षटकांचाच खेळ होऊ शकला. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीने दमदार अर्धशतक ठोकलं. पाठोपाठ मार्नस लाबूशेननेही आपली लय कायम राखत नाबाद अर्धशतकी मजल मारली. तो स्टीव्ह स्मिथ (३१*) सोबत ६७ धावांवर खेळतो आहे. पुकोव्हस्की मात्र ६२ धावांवर माघारी परतला. (memes)

पुकोव्हस्कीने पदापर्णच्या सामन्यातच अर्धशतक ठोकलं. महत्त्वाची बाब म्हणजे त्याला कसोटी पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीने माघार धाडले. पण त्याआधी ऋषभ पंतने दोन वेळा त्याला बाद करण्याची संधी गमावली. अश्विनच्या गोलंदाजी पुकोव्हस्की खेळत असताना पंतकडून त्याचा सोपा झेल सुटला. 

--------------------------------------------
Must Read

1) अभिजित जामदार याला जामीन

2) कोल्हापुरात एका दिवसात 10 नवे कोरोनाबाधित

3) गडकरींनी दिली Fastag बद्दल महत्त्वाची माहिती

---------------------------------------------

तर दुसऱ्या वेळी सिराजने टाकलेल्या उसळत्या चेंडूवर पंतने अप्रतिम असा प्रयत्न केला, पण चेंडू जमिनीवर टेकला असल्याचं समजल्याने पुकोव्हस्कीला जीवदान मिळाले. पंतच्या या सुमार कामगिरीमुळे त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्याच्याबद्दल भन्नाट मीम्स (memes)  सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) झाले.

दरम्यान, आजच्या दिवशीच्या खेळातील काही षटकांचा खेळ पावसामुळे वाया गेला. ती कसर भरून काढण्यासाठी उद्याच्या दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली.